शेतीत कितीही यांत्रिकीकरण झाले(Bail Pola) तरी शेतीतील कामासाठी ( बैलपोळा )बैलाचे महत्व आजही कमी झालेले दिसत नाही. शेतकऱ्याच्या उत्पन्नात त्याच्या सचोटीइतकाच त्याच्या बैलांच्या कष्टाचा मोलाचा वाटा देखील असतो. बैलांच्या या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात “बैलपोळा” (Bail Pola) सण साजरा केला जात असतो. पोळा हा सण श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येला येतो, महाराष्ट्रातील काही भागात भाद्रपद पोळा(Bail Pola) साजरा केला जात असतो आणि ज्याला “कारहूनी”म्हणतात. कर्नाटकातील शेतकरी जेष्ठ महिन्यात मूळ नक्षत्रावर बेंदूर साजरा करत असतात.

बैलपोळ्या(Bail Pola) दिवशी बैलांना अंघोळ घालून झुलींनी सजवले जात असते. शिंगांना रंगवले जाते, गळ्यात हार घातले जातात, आणि विधीवत पूजा केली जात असते. हा सण साजरा करताना काही रूढी- परंपरा पार पाडताना होणाऱ्या चुकांमुळे बैलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो आणि पोळ्याच्या परंपरा पार पाडताना होणारी इजा व त्यावरील उपाय काय आहेत ते पाहूया.
१) बैलांना घातली जाणारी अंघोळ
सध्या महाराष्टात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे त्यामुळे नद्या, नाले, ओढे यात मुबलक पाणीसाठा बर्याच प्रमाणात उपलब्ध आहे. आणि शेतकरी या पाणीसाठ्याला बैलांच्या अंघोळीसाठी प्राधान्य देत असतात. हे साठलेले पाणी बऱ्याच जिवाणू, विषाणू, परोपजीवी व त्यांची अंडी यांचे वस्तीस्थान असते आणि बैल या साठ्यामध्ये अंघोळीस आणल्यावर हे दूषित पाणी पितात व संसर्गास बळी पडू शकत असतात. इतर बैल(Bail Pola) या पाण्यात धुतल्यानंतर त्यांच्या शरीरावरील गोचीड,उवा, लिखा व त्यांची अंडी या पाण्यात मिसळून जातात व निरोगी बैलांना त्याचा प्रादुर्भाव दिसून येत असतो. नुकत्याच झालेल्या पेरणीदरम्यान व मशागत करताना बहुतांश बैलांना जखमा झाल्यामुळे या जखमातून दूषित पाण्यातील जंतू शरीरात प्रवेश करून संसर्गाची शक्यता बळावत असते. आणि त्यामुळे अंघोळीसाठी जलसाठ्यातील, गढूळ, दूषित पाण्याचा वापर प्रकर्षाने शकतो टाळावा. स्वच्छ पाणी वापरावे. शरीरावरील जखमांवर उपचारासाठी प्रतिजैवकांची (Bail Pola)योग्य मात्रा पशूवैद्यकाकडून टोचून घेतली पाहिजे. बैल जर सार्वजनिक जलस्रोताच्या संपर्कात आले असतील तर बाह्यपरोपजीवीनाशक औषध शरीरावर फवारावे आणि बैलाला जंतनाशक पाजावे निरोगी ठेवावे.
२) शिंग साळणे व शिंग रंगवणे
बैल जास्तीत-जास्त आकर्षक दिसावे म्हणून शिंगांणा आकार देण्यासाठी ते साळण्याची पद्धत हि संपूर्ण महाराष्ट्र भर असते. शिंग साळण्यासाठी वापरण्यात येणारी वस्तू निर्जंतुक नसल्यास जखम होऊन शिंगाच्या कर्करोगाचा धोका उद्भवत असतो. शिंगाच्या कर्करोगावर शिंग(Bail Pola) समूळ कापणे हा एकमात्र उपाय पशुवैद्यकाकडे राहत असते. परिणामी शिंग नसलेल्या बैलाची बाजारातील किंमत कमी होत असते. शिंग साळण्यासाठी वापरण्यात येणारी वस्तू गंजलेली असेल तर धनुर्वात होण्याची शक्यता जास्त असते. शिंग रंगवण्यासाठी ऑइल पेंट्सचा वापर केला जात असतो. या पेंट मध्ये झिंक ऑक्साइड, टीटॅनियम डायऑक्साइड, कॅडमीअम सारखे त्वचेसाठी घातक असणारी(Bail Pola) रसायने मिसळले असतात. यावर उपाय म्हणजे शिंग साळणे शक्यतो टाळावे आणि शिंग रंगवण्यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर हा करण्यात यावा. साळताना जखम झाली असल्यास उपचार करून धनुर्वात रोगप्रतिबंधक लस टोचून दिली पाहिजे.
३) तेल आणि अंड्याचे मिश्रण पाजणे
बैल तजेलदार, मांसल व धष्टपुष्ट दिसावे म्हणून तेलातून अंडी काही ठिकाणी पाजली जात असतात. हे मिश्रण चुकीच्या पद्धतीने पाजताना बैल ठसकतात आणि मिश्रण अन्ननलिकेऐवजी श्वासनलिकेतून फुफ़ुसात जात असते. आणि त्यामुळे फुफ़ुसाचा दाह म्हणजे न्यूमोनिया होऊन जनावर दगाऊ शकत असते. त्यामुळे मिश्रण पाजताना योग्य काळजी घ्यावी ज्याने जनावर ठसकणार नाही आणि तेल, (Bail Pola)अंडी यात स्निग्ध पदार्थ व प्रथिने असतात जी स्नायूंना बळकट करण्यासाठी व वजन वाढवण्यास उपयुक्त ठरतात यांना पर्याय म्हणून तेलबियांच्या पेंडीचा वापर शकतो करावा. जेणेकरून हेतू साध्य होईल आणि धोकाही टाळला जाईल.
हे हि वाचा : Milk : दुधातील फॅट कमी होण्याची कारणे कोणती? पहा काय कारण आहे फॅट कमी होण्याची कारण
४) पिठाचे गोळे व पोळ्या चारणे
पोळ्याच्या दिवशी व त्याआधी बैलांना ज्वारीच्या पिठाचे गोळे व नैवेद्य म्हणून पूरणपोळ्या,कडधान्याचा भरडा चारला जात असतो आणि प्रमाणाबाहेर चारल्या जाणाऱ्या ऐवजामुळे बैलाला पोटाच्या व्याधी निर्माण होत असतात. रक्तातील लॅक्टिक ऍसिडचे प्रमाण वाढून जीवाला धोका(Bail Pola) निर्माण होत असतो. पोटाच्या व्याधीमुळे बाधित जनावर पोटाला लाथा मारते, दात खाते, जीभ चावते, चारही पाय वर करून उजव्या बाजूस लोळत असते. अशी लक्षणे दिसून आल्यास तात्काळ पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावे आणि प्राथमिक उपचार म्हणून पाणी व खाण्याच्या सोड्याचे मिश्रण पाजावे. पाजताना जनावर ठसकणार नाही याची काळजी घेण्यात यावी.
५) बैलांची मिरवणूक
पोळ्यादिवशी संध्याकाळी सजवलेल्या बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढली जात असते. मिरवणूकीत बऱ्याच ठिकाणी बैल पळवले जातात अश्या वेळी अनेक ठिकाणी(Bail Pola) दुर्घटना घडून बैल गंभीर जखमी होत असतात. काही बैलांना-वेगाने पळण्याची सवय नसते म्हणून ती उधळतात आणि त्यांच्या आतड्याला पीळ पडण्याची दाट शक्यता निर्माण होत असते. त्यामुळे पोळा उत्साहात साजरा करावा पण सोबतच आपल्या पशुधनाची काळजी घेतली जावी.
हे हि वाचा : पोट, कमरेचा घेर जास्तच वाढलाय? पोटावर झोपून १० मिनिटं हा व्यायाम करा, कायम ढेरी बारीक होईल