Weather Update : हवामान अंदाज राज्याच्या या भागांत आज पावसाची शक्यता 2022 - डिजिटल शेतकरी

Weather Update : हवामान अंदाज राज्याच्या या भागांत आज पावसाची शक्यता 2022

राज्यात पावसाचा जोर (Rain Intensity) आजही कायम आहे आणि कोकणात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचीWeather Update (Rainfall) नोंद झाली आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात पावसाची (Vidarbh Rain Update) उघडीप दिली आहे. उद्या सकाळपर्यंत हवामान विभागानं (Weather Department) मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भात तुरळक ठिकाणी (Weather Update)जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Rain Yellow Alert) जारी केला गेला आहे.

कोकणातील बऱ्याच भागात हलका ते मध्यम पाऊस झाला आहे (Weather Update) आणि  पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड आणि मोखेडा या मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या आहे. रायगड जिल्ह्यातील मानगाव, नाथेरान, म्हसला, मुरुड, तला या मंडळांमध्ये पाऊस झाला आहे तसेच तर इतर मंडळांमध्ये पावसाची बुरबुर  सुरु होती.(Weather Update) रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, लांजासह काही मंडळांत श्रावण सरी झाल्या आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही बहुतांश मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या आहे.

Weather Update

मध्य महाराष्ट्रातील(Weather Update) अनेक भागांत पावसाची उघडीप कायम आहे आणि नगर जिल्ह्यात मागील सात दिवसांपासून पावसाची विश्रांती कायम आहे. सातारा, सांगली धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यात आजही अजिबात पाऊस पडला नाही. तर कोल्हापुरातील गगणबावडा, शाहुवाडी या मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या आहे तसेच नाशिक आणि पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या आहे.

हे हि वाचा : डाळिंबाची लाली उतरली पहा काय भाव असतील गणेशोत्सवात डाळिंबाचे दर वाढणार का

मराठवाड्यातील सर्वच मंडळांमध्ये पावसाची उघडीप कायम होती तसेच  काही ठिकाणी श्रावण सरी(Weather Update) झाल्या आहेत. विदर्भातही बहुतांश ठिकाणी पावसाची विश्रांती कायम होती आणि काही भागांत हलक्या सरी पडल्या आहे. मात्र सर्वच भागांमध्ये पावसाचा जोर नव्हता.

हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि हिंगोली तर संपूर्ण विदर्भात विजांसह तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज हवामान विभागनं व्यक्त केला जातोय.

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment