Milk : दुधातील फॅट कमी होण्याची कारणे कोणती पहा ?2022 - डिजिटल शेतकरी

Milk : दुधातील फॅट कमी होण्याची कारणे कोणती पहा ?2022

महाराष्ट्रामध्ये गाईच्या दुधात (Cow Milk) किमान फॅट ३.८; तर म्हशीच्या दुधात ६ फॅट (Fat) असणे आवश्‍यक आहे. त्यापेक्षा फॅट कमी असल्यास ते दूध(Milk )अप्रमाणित समजले जात असते. दुधाची किंमत स्निग्धांश वर ठरवली जात असते. पावसाळ्यात भरपुर प्रमाणात कोवळा व हिरवा चारा उपलब्ध असतो आणि त्यामुळे दुधाळ जनावरांना खुप जास्त प्रमाणात हिरवा चारा खाऊ घातला जातो. हिरव्या चाऱ्यामध्ये तंतुमय घटक आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे दुधातील फॅट कमी लागत असते. दुधातील फॅट(Milk )कमी लागण्याची नेमकी कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे आणि  महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेल्या माहितीनूसार दुधातील फॅटवर पुढील घटकांचा परिणाम होतो.

दुधातील(Milk )फॅट कमी लागण्याची कारणे

आनुवंशिकता किंवा जनावराची जात, जनावरांचा आहार, दूध काढण्याच्या वेळा, धार काढण्याची पद्धत, दुधाळ जनावरांतील आजार, दुधातील भेसळ तसेच जनावराचे वय इ. घटक दुधातील फॅट वर परिणाम करत असतात.

हे हि वाचा:लाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण 2022

दुधातील(Milk )फॅट चे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी काय कराल?

  • जनावरांच्या आहारात एकूण तंतुमय घटकांचे प्रमाण म्हणजेच कडबा किंवा वैरणीचे प्रमाण २८ ते ३१ टक्के असणे आवश्यक असते. दुधाळ जनावरांना आहारातून एकूण ६५ ते ७५ टक्के कडब्याचे प्रमाण मिळाले पाहिजे आहे आणि  जेणेकरुन जनावराच्या रुमेनमधील फायबर मॅट म्हणजे तंतुमय जाळे तयार होण्यास मदत होत असते. त्यामुळे कोटी पोटातील तंतुमय घटकाचे विघटन होऊन दुधातील फॅटचे सातत्य टिकून राहत असते.
  • दूध उत्पादन क्षमता आणि स्निग्धांशाचे प्रमाण हे गुणधर्म गुणसूत्राद्वारे नियंत्रित केले जात असते. त्यामुळे आनुवंशिकता किंवा जनावराची जात कोणती आहे यावरही दुधातील फॅटचे प्रमाण ठरत असते.
  • वर्षभर जो चारा उपलब्ध असेल तो जनावरांना खाऊ न घालता, चाऱ्याचे नियोजन करून जनावरांना योग्य प्रमाणात वर्षभर हिरवा व सुका चारा खाऊ घालावा लागतो.

हे हि वाचा : पावसाळ्यात जनावरांच्या आजारांची लक्षणे 2022

  • दूध काढण्याच्या दोन वेळांमध्ये जास्तीत जास्त १२ तासांचे अंतर असावे आणि हे अंतर वाढल्यास दुधाचे प्रमाण वाढू शकेल; पण दुधातील फॅटचे प्रमाण कमी होत असते.
  • दूध काढताना सुरुवातीच्या धारांमध्ये स्निग्धांशाचे प्रमाण साधारणपणे एक टक्का, तर शेवटच्या धारांमध्ये हे प्रमाण दहा टक्‍क्‍यांपर्यंत असते आणि त्यामुळे कासेतील पूर्ण दूध काढून घेण गरजेचं आहे.
  • दुधात केल्या जाणाऱ्या भेसळीमुळे फॅटचे प्रमाण कमी होत आहे. दुधात पाण्याची भेसळ केली असता, दुधातील घन घटकांचे प्रमाण कमी होत असते आणि  तसेच, दुधाची भुकटी मिसळून भेसळ केली असता दूध घट्ट दिसते, पण फॅट कमी लागते.

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

3 thoughts on “Milk : दुधातील फॅट कमी होण्याची कारणे कोणती पहा ?2022”

Leave a Comment