रात्री जेवल्यानंतर लगेच झोपता? ही सवय बदला लगेच बदला, जेवणानंतर १० मिनिटं तरी..
आपल्या चांगल्या वाईट जीवनशैलीचा (life style effects) परिणाम आपल्या भरपूर प्रमाणात आरोग्यावर होत असतात. अर्थातच जीवनशैली दोषपूर्ण असेल तर आरोग्यावर होणारे परिणाम नकारात्मकच असतात आणि आरोग्यावर परिणाम करणारी अशीच एक वाईट सवय म्हणजे रात्री जेवल्यानंतर लगेच झोपणे, एका जागी बसून राहाणे होय. या वाईट सवयीचा थेट परिणाम आपल्या पचनक्रियेवर होत असतो. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपण्याची, बसून राहाण्याची ही सवय लगेच बदलण्याचा सल्ला हैद्राबाद येथील कामिनेनी हाॅस्पिटलचे जनरल फिजिशियन आणि मधुमेहतज्ज्ञ डाॅ. मुक्शीथ कादरी यांनी दिली आहे. त्यांच्या मते रात्रीच्या जेवणानंतर चालायला गेल्यास (walk after dinner) रक्तदाब, मधुमेह, स्थूलता, गॅस्ट्रिक या आजारांचा धोका (benefits of walk after dinner) सहज टाळता येत असतो आणि डाॅ. मुक्शीथ कादरी हे रात्रीच्या जेवणानंतर चालण्याचे फायदे, कधी आणि किती वेळ चालावं याबाबतीत सविस्तर माहिती देत आहेत.
हे हि वाचा : पोट, कमरेचा घेर जास्तच वाढलाय? पोटावर झोपून १० मिनिटं हा व्यायाम करा, कायम ढेरी बारीक होईल
रात्री जेवल्यानंतर चालण्याचे फायदे
- रात्री जेवल्यानंतर चालायला गेल्यास पचन क्रिया सुधारत असते आणि गॅसेस, अपचन, बध्दकोष्ठता या समस्या दूर राहातात.
- वजन नियंत्रित ठेवण्यासाठी रात्री जेवल्यानंतर अवश्य फिरायला हवं आणि ज्या लोकांमध्ये स्थूलतेची समस्या असते त्यांच्यासाठी रात्री जेवणानंतर चालणं हे औषधासारखं काम करतं.
- रात्री जेवणानंतर चालण्यानं चयापचय क्रिया सुधारते असते त्यामुळेही वजन नियंत्रित राहाण्यास , कमी होण्यास मदत होते.
- जेवल्यानंतर चालण्याच्या सवयीमुळे पचन सुधारतं आणि त्याचा परिणाम रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी होत असतो जेवल्यानंतर थोडा वेळ चालण्यामुळे शरीरातील अवयव सुदृढ राहात असतात आणि पचन करण्यासाठी आतड्यांवर जास्त ताण येत नाही, यासाठी आतड्यांना जास्त कष्ट करावे लागत नाही.
- रात्री जेवल्यानंतर चालण्यामुळे शरीरात एंडोर्फिन हार्मोन स्त्रवतं आणि हे हार्मोन पुरेस्ं स्त्रवल्यामुळे तणाव कमी होतो.
- जेवल्यानंतर चालण्यामुळे रक्तप्रवाह सुधारत असतो आणि रक्तप्रवाहात येणारे अडथळे दूर होतात.
- मधुमेही रुग्णांसाठी रात्री जेवणानंतर चालणं ही आरोग्यदायी सवय असते आणि जेवणानंतर चालण्यामुळे रक्तातील साखर संतुलित राहाते.
जेवणानंतर कधी चालावं- किती चालावं?
रात्री जेवल्यानंतर लगेच चालल्यास पचनाला मदत होत असते. थकवा कमी होतो आणि शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. रात्रीच्या जेवणानंतर एक तासाच्या आत चालायला जाणं आवश्यक असते. जेवल्यानंतर 10 ते 20 मिनिटं चालणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरत असतं. हा वेळ वाढवत जाऊन अर्धा तास केल्यास त्याचे चांगले फायदे मिळतात असतात आणि तसेच रात्रीच्या जेवणानंतर घराबाहेरच चालायला हवं असं नाही. घरातल्या घरात चालण्याचेही फायदे मिळत असतात.
3 thoughts on “रात्री जेवल्यानंतर लगेच झोपता? ही सवय बदला लगेच बदला नाहीतर होतील गंभीर आजार 2022”