आंतरपिके आडसाली उसाची लागवड (Cultivation of sugarcane ) 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत केली जात असते. आडसाली उसाचा कालावधी 16 ते 18 महिन्यांचा आहे. उसाची लागवड केल्यानंतर पूर्ण उगवण होण्यासाठी सहा ते आठ आठवड्यांचा कालावधी लागत असतो. सुरवातीच्या कालावधीमध्ये उसाची वाढ हळू होत असल्यामुळे उसाच्या दोन सऱ्यांमध्ये आंतरपीक घेण्यासाठी भरपूर मोकळी जागा शिल्लक असते.
Cultivation of sugarcane: उसामध्ये आंतरपीक घेतल्याने एकूण निव्वळ उत्पन्नात वाढ होत असते. उसासाठी बियाणे, खते व आंतरमशागतीसाठी केलेला खर्च आंतरपिकाच्या उत्पन्नातून निघून जात असते. आंतरपीक घेतल्याने तणांच्या वाढीवर परिणाम होऊन तणांचे प्रमाण कमी होत असते आणि आडसाली उसामध्ये द्विदल वर्गातील भुईमूग, सोयाबीन व चवळी ही पिके किंवा मुळा, कोथिंबीर, मेथी व कांदा यासारखी भाजीपाल्याची आंतरपिके घेता येत असतात. द्विदल वर्गातील आंतरपिके घेतल्यास जमिनीचा पोत सुधारत असते.
ऊस बेणेप्रक्रिया ( Sugarcane weaving process )
कांडीवरील खवले कीड, पिठ्या ढेकूण तसेच काणी रोगाच्या बंदोबस्तासाठी 300 मि.लि. मॅलॅथिऑन + 100 ग्रॅम कार्बेन्डाझिम 100-११० लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात बेणे 10-१५ मिनिटे बुडवावे. रासायनिक बेणे प्रक्रियेनंतर अर्ध्या तासाने १० -११ किलो ऍसेटोबॅक्टर व 1.25 किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणू प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात बेणे अर्धा तास बुडवून नंतर लागवड करण्यात यावी.Cultivation of sugarcane
आंतरपिकांसाठी बीजप्रक्रिया ( Seed processing for intercrops )
कांदा ( Onion )– थायरम (तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे)
सोयाबीन ( soybeans )– सोयाबीन गटाचे रायझोबियम जीवाणू संवर्धक 250 ग्रॅम आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक 250 ग्रॅम प्रति दहा किलो बियाण्यासाठी वापरावे.
भुईमूग ( groundnut ) – रायझोबियम जीवाणू संवर्धक 250 ग्रॅम आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक 250 ग्रॅम प्रति दहा किलो बियाण्यासाठी वापरावे.
हे हि वाचा : पूर्वहंगामी ऊस लागवड तंत्रज्ञान
हे हि वाचा : ऊसावरील मधील पोक्का बोंग रोगाचे नियंत्रण कसे करावे
लागवडीची पद्धत ( Method of Cultivation )
सरीवरंबा पद्धत (पारंपरिक पद्धत) (Traditional Method)
हलक्या जमिनीत 90 सें.मी., मध्यम जमिनीत 100 सें.मी. व भारी जमिनीत 120 ते 150 सें.मी. अंतरावर सऱ्या वरंबे पाडून उसाची लागण सरीमध्ये केल्यानंतर दुसरे पाणी (आंबवणी) देण्याच्या अगोदर वरंब्याच्या दोन्ही बगलेत आंतरपिकाची टोकण पद्धतीने लागण करावी आणि कांद्याची लागण रोपे लावून करावी.
पट्टा पद्धत ( Belt method )
या पद्धतीत 75 सें.मी. (2.5 फूट) किंवा 90 सें.मी. (तीन फूट) अंतरावर सऱ्या पाडून प्रत्येक दोन सऱ्यांत ऊस लागवड करून तिसरी सरी मोकळी सोडावी आणि अशा प्रकारे जोडओळ लागवड करून राहिलेल्या 150 सें.मी. (पाच फूट) किंवा 180 सें.मी. (सहा फूट) पट्ट्यात आंतरपिकाची लागवड करण्यात यावी.
या पद्धतीत उसाच्या उत्पादनात घट येत नाही व आंतरपीक निघाल्यानंतर उसात आंतरमशागत करणे सुलभ होत जाते.
खुप सुंदर अशी माहिती मिळाली तर शेतकरी नक्कीच फायदा होईल धन्यवाद
चतुरसिंग पाटील
9422385538