पावसाचे थैमान, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत आणि मुंबईला ऑरेंज, पालघरला रेड अलर्ट
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर : गेल्या २४ तासांपासून कोसळणाऱ्या तुफानी पावसाने मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर परिसरात धो धो पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर यंत्रणांची तारांबळ उडाली आणि मुंबई परिसरातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर अनेक धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा जमा झाला आहे.
हे हि वाचा : केळी लागवड 2022
मुंबईत सखल भागांत पाणी साचले, रस्ते जलमय झाल्याने रस्ते वाहतूक कासवगतीने सुरू झाली आहे. तर रेल्वे वाहतुकीलाही पावसामुळे लेटमार्क लागला आणि दादर, सायन, माटुंगा, परळ, किंग्ज सर्कल, गांधी मार्केट परिसरात पाणी साचले. रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहे. काही वेळाने वाहतूक पूर्ववत झाली, तर या मुसळधार पावसाचा फटका मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही बसला आहे. आणि दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये ५६ टक्के पाणीसाठा झाला असून सात महिने पुरेल एवढा जलसंचय झाला आहे.
रायगडात
- रायगड जिल्हात गेल्या काही दिवसांपासून पावसाने मुक्काम ठोकला असून सावित्री, गांधारी, काळ, उल्हास, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.
- पेण तालुक्यातील खरोशी गावातील बाळगंगा नदीला आलेली भरती आणि पाऊस यामुळे गावात पाणी शिरल्याने रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आलेली आहे.
- कर्जत तालुक्यातील दहिवलीतर्फे वरेडी-नेरळ रस्त्यावर उल्हास नदीचे पाणी आल्याने वाहतूक पूर्ण बंद आहे आणि सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा ते कळंब रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.
मुंबईला ऑरेंज तर पालघरला रेड अलर्ट
- दक्षिण ओडिशा तटीय क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह पूर्व आणि पश्चिमेकडील प्रदेशातील हवामान बदलामुळे मुंबईसह राज्यभरात काही ठिकाणी अतिवृष्टी तर बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद वर्तविण्यात आली आहे.
- हीच परिस्थिती आज गुरुवारी कायम राहील. पालघर, नाशिक आणि पुणे या तीन जिल्ह्यांना गुरुवारी रेड अलर्ट देण्यात आला असून, येथे अतिवृष्टीची शक्यता आहे. तर आणि मुंबईसह ठाण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
वसईत
- वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीवली गावातील वाघराळपाडा भागात बुधवारी दरड कोसळी आहे.
- या दरडीखाली एकाच घरातील चार जण अडकले होते आणि त्यातील अमित ठाकूर (३५) व रोशनी ठाकूर (१४) या दोघा बाप-लेकीचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला आहे.
पालघर जिल्ह्यात हाहाकार
पावसाने गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याला झोडपून काढले आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील तानसा, वैतरणा, गारगाई, पिंजाळी, देहर्जा या पाचही मोठ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, विक्रमगड येथील धामणी धरण क्षेत्रामध्ये पाणीसाठा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सूर्या नदीमध्ये धरणाचे पाणी सोडण्यात येत आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे हाहाकार माजला असून, नद्या, नाले, धरणे तुडुंब भरून वाहत आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आणि आता पुराचा धोका लक्षात घेत ग्रामीण व दुर्गम भागातील सर्व शाळांना दुपारी दोननंतर सुट्टी देण्यात आली आहे.
नवी मुंबईत कोसळधारा
नवी मुंबईसह पनवेलला मंगळवार रात्रीपासून बुधवारी दिवसभर पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे पनवेलमधील पाताळगंगा आणि गाढी या नद्यांची पाणीपातळी वाढ झाली आहे. पाताळगंगेच्या पुरामुळे डाेलघरमधील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे.