औषधी व सुगंधी वेखंड बाजारात वेखंड या नावाने या वनस्पतीच्या खोडाचे सुके तुकडे मिळत असतात आणि त्यांचे चूर्ण औषधी व सुगंधी असते. त्याला काहीशी कडू व तिखट चव आहे. जिन, बिअर ही मद्ये किंवा शिर्का (व्हिनेगर) इत्यादींना स्वाद येण्यास व काही सुगंधी द्रव्यांत वेखंड वापरतात आणि सुजेवर आंबेहळद व वेखंड यांचा उगाळून लेप देतात. वेखंड वांतिकारक व दीपक (भूक वाढविणारे) असून भूक न लागणे, पोटदुखी, ताप, दमा, खोकला, श्वासनलिकादाह (घशातील खवखव) इत्यादींवर व मुलांना आमांशावर ते देत असतात. ते आकडीरोधक व तंत्रिका (मज्जा) शक्तिवर्धक आहे आणि ते मानसिक विकृतींवरही उपयुक्त आहे. स्त्रियांना प्रसूतिसमयी वेणांचा जोर वाढविण्यास केशर व पिंपळी मुळाबरोबर वेखंड देत असतात; बाळंतपणातही देतात. अंगदुखी व सर्दी यांवर वेखंड चूर्ण अंगास चोळतात व पोटातही देत असतात. तान्ह्या मुलांच्या तक्रारींवर वेखंड उपयुक्त ठरले आहे आणि वेखंडाच्या चूर्णाच्या वासाने ढेकूण, पिसवा, उवा इ कीटक दूर जातात. सुकलेल्या वेखंडाच्या खोडात १.५-३.५% पिवळट व उडून जाणारे सुगंधी तेल असते आणि मुळात अॅकॉरीन हे ग्लुकोसाइड असते; त्यांचे चूर्ण कृमिउत्सर्जक (जंत पाडून टाकणारे) असते व इराणी वेखंड काळसर व अधिक सुगंधी असते.
हे हि वाचा : बिब्बा एक औषधी वनस्पती 2022
हे हि वाचा : केवडा एक औषधी वनस्पती 2022
लागवड, मशागत इ.
हलकी गाळाची व दुमट जमीन ह्या पिकास चांगली येत असते. मागील वर्षातील खोडांची शेंडे सु. ३०-३५ सेंमी अंतराने लावतात; तत्पूर्वी प्रथम एकदा पाणी देऊन शेत नांगरतात व हिरवे खत देत असतात आणि पेरणीत पानांचे झुपके जमिनीवर राखून ठेवतात. सुमारे एक वर्षभर वाढल्यावर पीक काढतात व त्या वेळी खोडांची शेंडे कापून पुढील लागवडीसाठी राखून ठेवतात. उरलेल्या खोडांची तुकडे उन्हात चांगले वाळवून नंतर विक्रीस आणत असतात. कर्नाटकातील कोरटगिरी तालुक्यात याची लागवड केलेली आढळत आहे. आणि दर हेक्टरी सु. ३,४०० किग्रॅ. सुके तुकडे निघतात.
वेखंड : फुलझाडांपैकी ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी), परिचित, ओषधीय वनस्पती आशिया, यूरोप, उ. अमेरिका, श्रीलंका व भारत येथे सर्वत्र पाणथळ जागी आढळत असते.हिमालयात, सिक्कीममध्ये सु. १,८६२ मी. उंचीवर तसेच काश्मीर, सिरमूर, मणिपूर व नागा टेकडयांत ती आढळत आणि ती भारतात व श्रीलंकेत जंगली अवस्थेत किंवा लागवडीत सापडते. वेखंडात अॅकॉरस या प्रजातीत (वंशामध्ये) फक्त दोन जाती असून त्यांचा प्रसार उत्तर समशीतोष्ण प्रदेशांत व आग्नेय आशियात होत आहे. वेखंडाचे (अॅ. कॅलॅमस) मूलक्षोड बोटाइतके जाड, सु. १.८-२.५ सेंमी. व्यासाचे, मांसल व सरपटत जमिनीत वाढणारे, तपकिरी रंगाचे, सुगंधी व शाखायुक्त आहे. पाने गर्द हिरवी, टोकदार, अरुंद, दोन रांगांत व गवतासारखी बिनदेठाची, समांतर शिरांची असतात आणि फुलोरा ५-१० सेंमी. लांब, किंचित वाकडा व हिरवा असून महाछद (बाहेरचे आवरण) पानाइतका लांब असून फुले द्विलिंगी व फिकट हिरवी असते परिदले फडीसारखी व सहा, केसरदले (पुं-केसर) सहा, ऊर्ध्वस्थ किंजपुट (अविकसित फळ) तीन कप्प्यांचा व त्यातील प्रत्येक कप्प्यात दोन बीजके (अविकसित बीजे) आहे. मृदुफळ भोवऱ्यासारखे व पिवळट असते आणि इतर सामान्य लक्षणे अॅरॉइडी कुलात (अथवा सुरण कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.