गेल्या वर्षाप्रमाणेच यंदा देखील चांगला कापूस(cotton)उत्पादक शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला दमदार भाव मिळणार असून, अमेरिकेतील मुख्य लागवड होणाऱ्या टेक्सास, कॅलीफोर्नीया या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळाची परिस्थिती असल्याने अमेरिकेतील कापसाच्या उत्पादनात २५ ते ३० टक्के घट होण्याचा अंदाज कॉटन(cotton) मार्केटमधील जाणकारांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे अमेरिकेकडून होणारी निर्यात कमी होवून, भारताला ही संधी उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने भारतीय बाजारात कापसाची मागणी खूप वाढणार आहे. त्यामुळे यंदा कापूस उत्पादक भारतातील शेतकऱ्यांना दमदार भाव मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गेल्यावर्षी जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे कापूस(cotton) उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाचे जवळपास ३५ ते ४१ टक्के नुकसान झाले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारासह देशातंर्गत मागणी वाढल्यामुळे कापसाला रेकॉर्डब्रेक भाव मिळाला होता . त्यामुळे अतीवृष्टीमुळे नुकसान होवूनही, शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता आणि यंदा देखील चांगला भाव मिळेल या अपेक्षेने भारतात देखील कापसाचा पेरा वाढला आहे. त्यात सध्यातरी अनेक भागांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे कापसाची(cotton) स्थिती चांगली असून कापूस निघायला लागला आहे. त्यातच आता आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती पाहता कापसाची मागणी गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिकपटीने वाढणार आहे आणि त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार आहे
काय आहे कारण…
१. अमेरिका जगातील सर्वात मोठा कापूस(cotton) निर्यातदार देश असून, या देशात सुमारे २ कोटी ५० लाख गाठींचे उत्पादन केले जात असते अनिये तसेच या सर्व मालाची अमेरिकेकडून निर्यात केली जात असते.
२. अमेरिकेतील टेक्सास, कॅलीफोर्नीया या मोठ्या राज्यांमध्ये देशातील एकूण कापूस लागवडीच्या सुमारे ५० टक्के उत्पादन घेतले जात असते मात्र, यंदा याच राज्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे..
३. दुष्काळामुळे अमेरिकेच्या कापूस उत्पादनात २० ते २५ टक्के घट किवा त्यापेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे अमेरिकेकडून होणाऱ्या निर्यातमध्ये घट होणार आहे.
४. अशा परिस्थितीत चीन, बांग्लादेश, व्हिएतनाम, पाकिस्तान अशा देशांनाही भारताकडून निर्यात वाढवावी लागणार आहे आणि त्यामुळे भारतीय बाजारात कापसाची मागणी वाढेल व दर देखील चांगला मिळण्याची शक्यता आहे.
हे हि वाचा : कापसाला आला १६ हजारांचा भाव शेतकरी आनंदात
सर्वात जास्त कापसाचे उत्पादन घेणारे देश खालील प्रमाणे
चीन – ५ कोटी गाठी
भारत – ३ कोटी ५० लाख गाठी
अमेरिका – २ कोटी ५० लाख गाठी
– चीनमध्ये जरी कापसाचे उत्पादन सर्वाधिक होत असले तरी हे उत्पादन चीनच्या मार्केटसाठी कमी पडत असते आणि त्यामुळे चीन मोठ्या प्रमाणात कापसाची आयात करत असतो.
– भारतात दरवर्षी ३ कोटी ५० लाख गाठींचे उत्पादन होत असते, मात्र यंदा भारतात कापसाचे क्षेत्र वाढल्याने यंदा ३ कोटी ७० लाख गाठींपर्यंत उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली आहे.
– अमेरिकेतील कापसाचे उत्पादन कमी होणार असल्याने, चीन, पाकिस्तान, व्हीएतनाम, बांग्लादेश यांना भारताकडून होणाऱ्या निर्यातीत वाढ करावी लागणार आहे.
– त्यातच भारतातील सुत गिरण्या वेगाने सुरु असल्याने कापसाला देशातंर्गत मागणी कायम राहणार असल्याने कापसाचे भाव अजूनही वाढणार आहेत.
3 thoughts on “cotton : अमेरिकेचा दुष्काळ भारतीय कापूस उत्पादकांच्या पथ्थ्यावर, पांढऱ्या सोन्याला झळाळी 2022”