सध्या कपाशी(Cotton) पिकावर मावा, पांढरी माशी व तुडतुडे अशा रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे आणि त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते, हे लक्षात घेता एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करणे गरजेचे आहे.
१) मावा :
हीकीड रंगाने पिवळसर किंवा फिकट हिरवी आणि आकाराने अंडाकृती असते आणि मावा व त्याची पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने आणि कोवळ्या शेंड्यावर समुहाने राहून रस शोषत असतात. आणि अशी पाने(Cotton) निस्तेज होऊन आक्रसतात, खालील बाजूला मुरगळलेली दिसत असतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटत असते आणि मावा किडीच्या शरीरातून स्रवणाऱ्या गोड चिकट द्रवामुळे पाने चिकट बनत असतात. कालांतराने त्यावर काळी बुरशी वाढून, पानाच्या अन्न निर्मिती प्रक्रियेत अडथळा निर्माण होत असतात. (Sucking Pest Control On Cotton Crop)
२) पांढरी माशी :
प्रौढ माशी आकाराने लहान शरीरावर पिवळसर झाक असून पंख पांढरे दिसत असतात. (Cotton) डोक्यावर दोन तांबडे ठिपके असतात आणि प्रौढ व पिल्ले पानाच्या खालील बाजूला राहून रस शोषत असतात. अशी पाने कोमेजतात आणि अधिक प्रादुर्भावामध्ये पाने लालसर ठिसूळ होऊन शेवटी वाळत असतात. पिल्लांच्या शरीरातून स्रवणाऱ्या गोड चिकट द्रवामुळे पानावर काळी बुरशी वाढत असते आणि तसेच पांढरी माशी रोगाचा प्रसार करतात. या किडीचा प्रादुर्भाव कोरडवाहू कपाशीवर(Cotton) सप्टेंबर महिन्यापासून सुरू होतो आणि नोव्हेंबर महिन्यात अधिक प्रादुर्भाव दिसून येत असते.
३) तुडतुडे :
प्रौढ व पिल्ले फिकट हिरवे, पाचरी प्रमाणे असतात आणि समोरच्या पंखावर एक काळा ठिपका असतो. तुडतुड्यांच्या पिल्लांना पंख नसतात आणि तुडतुड्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते तिरके चालत चटकन उडी मारत असतात. प्रौढ व पिल्ले पानाच्या(Cotton) खालील बाजूला राहून रस शोषतात आणि त्यामुळे पाने प्रथम बाजूने पिवळसर होऊन नंतर तपकिरी होतात. अधिक प्रादुर्भावामध्ये संपूर्ण पाने लाल तांबडी, त्यांच्या कडा मुरगळलेली दिसत असतात आणि परिणामी झाडांची वाढ खुंटते. अशा झाडांना पाते, फुले आणि बोंडे कमी प्रमाणात लागत असतात.
आर्थिक नुकसान पातळी :
– १० मावा प्रति पान – ८ ते १० प्रौढ पांढरी माशी किंवा २० पिल्ले प्रति आणि -२ ते ३ तुडतुडे प्रति पान
आढळून आल्यानंतर रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा आणि त्यापूर्वी एकात्मिक नियंत्रण पद्धतीचा अवलंब करत राहणे आवश्क आहे.
व्यवस्थापन :
-वेळोवेळी प्रादुर्भावग्रस्त फांद्या, पाने व इतर पालापाचोळा जमा करून नष्ट करण्यात याव्या.
-खुरपणी, कोळपणी करून पीक ताणविरहित ठेवले जावे.
-माती परिक्षणानुसार नत्र खतांचा योग्य प्रमाणात वापर करावा आणि त्यामुळे कपाशीची अनावश्यक कायिक वाढ होणार नाही. अशा पिकावर कीड कमी प्रमाणात रहणार आहे
-निसर्गतः रसशोषक किडीवर उपजीविका करणारे मित्र कीटक उदा. ढालकीटक, सिरफिड माशी, क्रायसोपा, ॲनसियस असे परोपजीवी कीटक आढळून आल्यास रासायनिक कीटकनाशक फवारणी करू नये आणि मित्र किटकांचे संवर्धन होईल.
– पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे लावावेत.
-पीक वाढीच्या सुरुवातीपासून निंबोळी अर्क (५ते६ टक्के) किंवा ॲझाडिरॅक्टीन (१००० पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात यावी.
-किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास खालील पैकी कोणत्याही एका रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करण्यात यावी. (प्रमाण ः प्रति लिटर पाणी)
फ्लोनिकॅमिड (५० टक्के डब्ल्यूजी) ०.३ ग्रॅम किंवा
थायामेथोक्झाम (२५ टक्के डब्ल्यूजी) ०.२ ग्रॅम किंवा
ब्युप्रोफेजीन (२५ टक्के एससी) २ मिलि किंवा
फिप्रोनील (५ टक्के एससी) ३ मिलि किंवा
डायफेन्थुरॉन (५० टक्के डब्ल्युपी) १.२ ग्रॅम किंवा
हे हि वाचा : नव्या कापसाला मिळतोय चांगला १२ हजाराचा दर
ॲसीफेट (५० टक्के) अधिक इमिडाक्लोप्रीड (१.८ एसपी) (संयुक्त कीटकनाशक) २ ग्रॅम
विशेषतः फूल किडीच्या व्यवस्थापनाकरिता,
फिप्रोनिल (५ टक्के एससी) ३ मिलि किंवा स्पिनेटोरम (११.७ टक्के एससी) ०.८४ मिलि
टीप : फवारणीसाठी शुद्ध पाणी वापरण्यात यावे.
शेतात कीटकनाशकांचे द्रावण तयार करताना व फवारणी करताना चष्मा, हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर हा करावा.
फवारणीसाठीच्या मात्रा हाय व्हॉल्यूम पंपासाठीच्या आहेत याची काळजी घावी.
हे हि वाचा : गुलाबी बोंडअळीला कसं रोखाल कसे कराल नियोजन