Irrigation Scheme: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदान संपूर्ण माहिती 2024 अर्ज - डिजिटल शेतकरी

Irrigation Scheme: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदान संपूर्ण माहिती 2024 अर्ज

Irrigation Scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या लेखात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या योजनेचा आपल्या शेतकरी बांधवांनी कसा लाभ आपल्या शेतीसाठी करून घेता येईल. त्यासाठी या योजनेचा अर्ज कुठे दाखल करायचा, लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ,लाभ कोणत्या शेतकऱ्यांना घेता येईल,या योजनेसाठी लागू असणाऱ्या अटी तसेच या योजनेअंतर्गत शेतकऱयांना जल सिंचनाच्या कोणत्या गोष्टी मिळणार आहेत हे सर्व काही आपण या लेखात पहाणार पाहणार आहोत. त्यासाठी संपूर्ण लेख वाचणे आवश्क आहे.तसेच काही महिती न समजल्यास जवळच्या csc सेंटर ला भेट द्या किवा शेतू कार्यालय आपले सेवा केंद्र येथे भेट द्या.आपणास संपूर्ण माहिती हि भेटून जाईल.तसेच ऑनलाई अर्ज करता येईल.

Irrigation Scheme पाण्याचा शेतीसाठी पुरेपूर वापर शेतकऱ्यांना करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने जलसिंचनाची सूक्ष्म सिंचन योजना राबवली संपूर्ण महाराष्ट्रत आहे. जेणेकरून कमी पाण्यात सुद्धा शेतकऱ्याला भरघोस उत्पादन घेता यावे हि या मागचा उदेश आहे. यासाठीच राज्य सरकारने ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन योजना राबवली जात  आहे.

 २४ कोटी ४० लाख प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी सन २०२०-२१ निधी वितरित

ठिबक सिंचन

Irrigation Scheme लहान नळीद्वारे झाडाच्या मुळाला थेंब थेंबाने पाणी देण्याची आधुनिक सिंचन प्रणाली म्हणजे ठिबक सिंचन होय. या आधुनिक सिंचन प्रणालीमुळे अतिशय कमी पाण्यात सुद्धा पीक चांगले वाढत असते. थेंब थेंबाने पाणी दिल्यामुळे पाणी थेट मुळापर्यंत जाते आणि झाडाची पाण्याची गरज पुरेपूर भागली जात असते. हीच गोस्ट लक्ष्यात घेता, राज्य शासनाने याचा लाभ आपल्या शेतकऱ्यांना करून द्यावा याच उद्दिष्टाने हि योजना मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. तसेच महाराष्ट्र हा ठिबक सिंचनात अग्रेसर असून ६०% ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रातच केले जात आहे.

तुषार सिंचन

तुषार सिंचन प्रणालीद्वारे पंप, स्पिंकलर्स, वॉल्व्ह आणि पाईप्स द्वारे पाणी दिले जाऊन कमी पाण्यात चवली शेती करण्याची जलसिंचन प्रणालीचा पावर करत  आहे. या सिंचन प्रणालीचा वापर औद्योगिक आणि शेतीसाठी केला जात आहे. जेव्हा पंपच्या मदतीने मुख्य पाईपद्वारे दाबून पाणी वाहू दिले जाते तेव्हा फिरणाऱ्या नोझल मधून बाहेर पडते आणि ते पिकावर लहान पावसासारखे शिंपडले जात असते.या सिंचन प्रणालीद्वारेही पाणी कमी प्रमाणात वापरले जाते आणि तेही थेट पिकाच्या मुळाशी जात असते.

नोट :

  • या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सगळ्याच शेतकऱ्यांना घेता येत  आहे . या योजनेसाठी जातीची काहीही अट नसते.
  • शेतकरी एससी, एसटी जातिचा असल्यास तर जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
  •  प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत खालीलप्रमाणे अनुदान शेतकऱ्याला देण्यात येणार आहे :
  • अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ८० %  अनुदान तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचनावर मिळणार आहे. तर इतर राहिलेल्या शेतकऱ्यांना हि  ८० % अनुदान मिळणार आहे.मागील वर्षी हे अनुदान ४५ तसेच ५५% मधे होते तेच आता वाढून ८० % करण्यात आले आहे.

कोण करू शकता अर्ज पात्रता खालील प्रमाणे :

 जर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज करावयाचा असेल, तर खालील शेतकऱ्याची पात्रता असणे अनिवार्य आहे :

  • शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे महत्वाचे  आहे .
  • बँक पासबुक असणे आवश्क आहे.राष्ट्रीय कृत बँकेचे बँक पासबुक गरजेचे आहे.
  • तसेच शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा  आणि 8-अ  असणे फार गरजेचे आहे .
  • अर्जदार हा sc/st  अनुसूचित जातीजमातीचा असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी  विद्युत जोडणी  आवश्यक आहे. तसेच त्यासाठी शेतक-यांना वीज माहिती सादर करणे गरजेचे आहे.
  • जर शेतकऱ्याने २०१६-१७ च्या आधी अश्या योजनेचा ;लाभ घेतला असेल तर पुढील ७  वर्ष तरी त्या सर्व्हेनंबरसाठी त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही याची सर्व शेतकर्यांनी  नोंद घ्यावी.
  • शेतकऱ्यांना ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेतच या योजनेचा  लाभ देण्यात येत असतो.
  • पूर्व संमती आल्या शिवाय आपण सिंचन खरेदी करू नये. पूर्व संमती आल्या नंतर तरच सिंचन खरेदी करता येते याची नोंद घावी.
  • फॉर्म भरल्यानंतर शेतकऱ्याला  सिंचन प्रणाली विकत घेण्यासाठी  पूर्वमंजुरी मिळाल्यावर अधिकृत विक्रेत्याकडून सिंचन विकत घेऊन ३० दिवसाच्या आत त्याच्या पावत्या अपलोड कराव्या लागत असतात.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज दाखल करण्यासाठी महाडीबीटी  पोर्टल ला भेट द्या आणि पात्र असल्यास या योजनेचा अवश्य लाभ घ्या.आणि आणखी नवीन योजनांची माहिती साठी वारंवार या साईट ला भेट देत चला. आही तुमचा साठी सर्व शेतकरी योजना ची माहिती पाठवत असतो. तसेच आपण पुढील लेखात अजून वेगवेगळ्या योजनेची माहिती पहाणार आहोत तसेच अर्ज कुठे करायचा याची संपूर्ण माहिती हि आपणा परेंत मिळणार आहे.

हे हि वाचा : गट शेती योजना काय आहे आणि फायदे अनुदान

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

 

7 thoughts on “Irrigation Scheme: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदान संपूर्ण माहिती 2024 अर्ज”

  1. kurshi सहाय्यक तुषार सिंचन ची पाहणी करण्या साठी येत नाही बिल सगळ अपडेट केल्या ती embossing ghya te pn zal yetch nahi 6 महिने झालं konakd तक्रार करावी

    Reply

Leave a Comment