महाराष्ट्रामध्ये कलिंगड(Watermelon)व खरबूज ही दोन्ही पिके घेतली जातात. महाराष्ट्रात कलिंगडाची लागवड अंदाजे ६६९ हेक्टर क्षेत्रावर तर खरबूजाची लागवड २३८ हेक्टर क्षेत्रावर केली जाते. महाराष्ट्रात दोन्ही पिके उन्हाळी हंगामात नदीच्या पात्रात तसेच बागायती पीके घेतले जाते. कच्च्या कलिंगड(Watermelon) भाजीसाठी तसेच लोणच्यासाठी वापरले . कलिंगडाच्या(Watermelon) रसाचे सरबत उन्हाळ्यात फार चविष्ट व थंडगार असते. खरबुजाचे फळ मधुर व स्वादिष्ट असते. त्याला एक प्रकारचा सुगंध असतो. या फळामध्ये चुना, फॉस्फरस ही खनिजे व अ ,ब ,क जीवनसत्वे देखील काही प्रमाणात असतात.
यासाठी जमीन व हवामान कसे असावे ते पाहूया !
मध्यम काळी परंतू पाण्याचा निचरा होणारी जमीन या पिकास योग्य व सुपीक असते. या पिकांकरीता जमिनीचा सामू ५.६ ते ७ योग्य असतो. दोन्ही पिकासाठी उष्ण व कोरडे हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. वेलींची वाढ होण्याकरिता २३ अंश सेल्सिअस ते २७ अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त असते. तापमानात कमी अधिक वाढ झाल्यास म्हणजेच १८ अंश सेल्सिअसच्या खाली व ३२ अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास वेलींच्या वाढीवर व फळधारणेवर देखील विपरीत परिणाम आहे. २१ अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान असल्यास बियांची(Watermelon) उगवण होत नाही.
लागवड हंगाम कधी असावा!
या पिकांची(Watermelon) लागवड जानेवारी किवा फेब्रुवारी महिन्यात केली जाते.
बियाण्याचे प्रमाण कसे असावे!
कलिंगडासाठी(Watermelon) हेक्टरी२.६ ते ३ किलो बियाणे व खरबूजासाठी हेक्टरी १.६ ते २ किलो बियाणे पुरेसे असते. पेरणीपूर्वी प्रती किलो बियाणास ३ ग्रॅम थायरम लावून घ्यावे.
पूर्वमशागत कशी करावी!
शेतात उभी आडवी नांगरणी करून ढेकळे फोडावी व एक वखारणी द्यावी तसेच जमीन तयार करावी . शेतात चांगले कुजलेले १५ ते २२ गाड्या शेणखत टाकावे. नंतर वखरणी करावी.
लागवड कशी करावी!
कलिंगड(Watermelon) व खरबूजाची लागवड बिया टोकून करतात कारण त्यांची रोपे स्थलांतर सहन करू शकत नाहीत.
या पिकांची लागवड कशी करावी खालील प्रकारे पहा ,,,
आळे पद्धत – ठराविक अंतरावर आळेकरून त्यात शेणखत मिसळून मध्यभागी ३-४ बिया टोक्याव्यात.
सरी वरंबा पद्धत – 2 X ०.५ मीटर अंतरावर कलिंगडासाठी तर खरबूजासाठी १ X ०.५ मीटर अंतरावर ३ ते ४ बिया टोपुन लावाव्यात.
(Watermelon)रुंद गादी वाफ्यावर लागवड या पद्धतीतलागवड रुंद गादीवाफ्याच्या दोन्ही बाजूंनि करण्यात यावी . त्यामुळे वेळ गादी वाफ्यावर पसरतो व फळे पाण्याच्या संपर्कात न येत खरब होत नाहीत. यासाठी३ ते ४ मी. अंतरावर सरी पडून सरीच्या बगलेत दोन्ही बाजूंना १ ते १.५ मी. अंतरावर ३ ते ४ बिया टोक्याव्यात.
खते व पाणी व्यवस्थापन कसे करावे ते पाहावे !
दोन्हीपिकासाठी५० किलो नत्र,५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश लागवडीपुर्व द्यावा व लागवडीनंतर १ महिन्यांनी ५०किलो नत्राचा दुसरा हफ्ता द्यावा. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी द्यावे वेलीच्या वाढीच्या काळात ५ ते ७ दिवसांच्या अंतराने व फळधारणा होऊन फळ वाढू लागल्यावर ८ते १० दिवसांच्याअंतराने पाणी दिले पाहिजे . उन्हाळी हंगामात कलिंगडाला(Watermelon) साधारणपणे१५-१७ पाळ्या द्याव्या लागतात.
आंतरमशागत म्हणजे काय !
बी उगवून वेल पूर्ण वाढीला लागेपर्यंत आजूबाजूचे सर्व तण काढून रान भुसभुशीत ठेवणे गरजेचे आहे . रानातील म्होठले तण हातानी उपटून टाकावे. भारी जमिनीत बे पेरल्यानंतर पाणी देऊ नये. कारण अशा जमिनीत पाणी सुकल्यानंतर वरचा थर कडक होतो. अशा जमिनीस प्रथमतः पाणी देऊन वाफसा आल्यानंतर बी टोकावे.
१) वाण / कलिंगड
अर्का ज्योती – ही संकरित जात असून फळ मध्यम ते मोठ्या आकराचे फिकट हिरव्यारंगाचे व गडद हिरवे पट्टेअसलेले असून गरगडदगुलाबी व गोड असतो. ही जात साठवणूकीस व वाहतुकीस उत्तम आहे. हेक्टरी उत्पादन 700 ते ८०० क्विंटल मिळते.
२) अर्का माणिक – या जातीच्या फळांचा आकार अंडाकृती ,साल पातळ हिरव्या रंगाची असून गडद हिरवे पट्टे असतात. फळाचे वजन ६ किलो पर्यंत असते. हेक्टरी उत्पादन ६०० ते ६५० क्विंटल मिळते.
३)आशियाई यामाटो – ही जपानी जात असून मध्यम अवधीत तयारे होते. फळांचे सरासरी वजन ७ ते ८ किलो असते. फळ फिकट रंगचे व गडद पट्टे असलेले असते. गर गडद गुलाबी व गोड असतो.
४)शुगर बेबी – ही जात महारष्ट्रात लोकप्रिय आहे. फळ मध्यम आकाराचे ४ ते ५ किलो चे असून फळाचा रंग कळपात हिराव असून गर लाल अत्यंत गोड असून बिया लहान असतात.
५)न्यू हँम्प शायर – ही जात फळांची लवकर येणारी जात अंडाकृती असून साल पातळ हिरव्या रंगाची व त्यावर हिरवे पट्टे असणारी असून गर गडद लाल व गोड असतो.
या शिवाय दुर्गापुर केसर,अर्का माणिक,पुसा बेदाणा या जाती लागवडीस योग्य आहेत.
६)पुसा शरबती – या जातीची फळांचा आकार गोल,किंचित लांबट ,साल खडबडीत जाळीयुक्त आणि मधून मधून हिरवे पट्टे ,गर नारंगी रंगाचा व जाड असतो.
७)हरा मधु – ही जात उशिरा येणारी असून फळांचा आकार गोल असतो. फळाची वरची साल पांढरी असून त्यावर खोलगट हिरवे पट्टे असतात. गर फिकट व हिरव्या रंगाचा गोड असतो,
८)अर्का राजहंस – ही लवकर येणारी जात असून फळ मध्यम ते मोठे १ त्ये १.५ किलोचे असते. साल मळकट पांढरे असते. फळ गोड असून साठवनुकीस उत्तम असते. हेक्टरी उत्पादन ३२० क्विंटल मिळते.
९)दुर्गापूर मधु – मध्यम अवधीत तयार होणारी जात असून फळे लांबट लहान असून साल फिक्कट हिरव्या रंगाची असते व त्यावर हिरव्या रंगाच्या धरी असतात. गर फिक्कट हिरव्या रंगाचा गोड असतो.
१०)अर्का जीत – ही लावकर येणारी जात असून फळांचे वजन ४०० ते ८०० ग्रॅम असते. फळे आकाराने गोल, आकर्षक व पिवळ्या रंगाचे असते.या शिवाय लखनऊ सफेदा, खारीधारी, फैजाबादी इत्यादी स्थानिक जाती लागवडीस योग्य आहेत.
रोग व कीड नियंत्रण कसे करावे ते पहा !
अ) रोग/भुरी या रोगाची सुरवात पानापासून होते. पानाच्या खालच्या बाजूस पिठासारखी बुरशी वाढते. नंतर ती पंच्या पृष्टभागाव्रर वाढते त्यामुळे पाने पांढरी दिसतात. रोगाचे प्रमाण वाढल्यावर पाने पिवळी पडून गळ लागते.
त्यावरील उपाय जाणुन घ्या खालील प्रमाणे !
- डीनोकॅप किंवा कार्बेन्दँझिम हे औषध ९० लिटर पाण्यात १० ग्रॅम या प्रमाणत मिसळून फवारावे.नंतर दर १५ दिवसांनी २ ते ३ वेळा फवारवे. नंतर दर १५ दिवसांनी २ ते ३ वेळा फावरणी करावी.
- केवडा/पानाच्या खालच्या बाजूला पिवळ्या भुरकट रंगाचे ठिपके दिसतात नंतर पानाचे देठ व फांद्यावर याचा प्रसार जास्त प्रमाणात होतो.
- उपाय / डायथेन झेड -७८ ०.२% तीव्रतेची फवारणी करून हा रोग आटोक्यात आणता येईल.
- मार/ हा बुरशीमुळे होणारा रोग असून पिक फुलावर असताना या रोगाचा प्रादुर्भाव होतो. पाने पिवळी पडतात. फुल गळ होऊन वेल निस्तेजपणे दिसतात. व कालांतराने मारतात.
- उपाय/ हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. त्यामुळे पेरणीपुर्व १ किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम चोळावे.
ब) कीड
- फळमाशी/ या माशीच्या अळीमुळे पिकाचे नुकसान होते. माशी फळांच्या सालीत अंडे घालते . त्यामुळे आळी फळातील गर खाते त्यामुळे फळे जास्त सडतात.
- उपाय / कीड लागलेली व खाली पडलेली फळे नष्ट करावीत. पिकावर व जमिनीवर मेँलाँथीऑन या औषधाचा १ टक्का तीव्रतेचा फवारा मारावा लागतो .
- तांबडे भुंगे/ बी उगूवून अंकुर वर आल्यावर त्याच्यावर नारंगी तांबड्यारंगाचे भुंगेरे उपजीविका करत आहे .
- मावा / हिरव्या किंवा काळ्या रंगाचे बारीक किडे पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पाने पिवळी पडून मलूल पडतात.
- उपाय /किड दिसल्यास मँलाँथीआँनहे औषध ०.१ टक्का या प्रमाणात फवारावे.
हे हि वाचा : डाळिंब लागवडी संदर्भात शेतकऱ्यांनो जाणून घ्या विशेष तंत्रज्ञान
काढणी व उत्पादन!
कलिंगड व खरबूज काढणी फळ पुर्ण पिकल्यावर करतात. नदीच्या पत्रातील फळे बगयातीपेक्षाथोडी लवकर तयार होतात. बी पेरल्यानंतर ३ ते ३.५ महिन्यात काढणी सुरु करावी आणि व ३ ते ४ आवडयात पुर्ण होते. आकार व रंगावरून फळांची पक्वता ठरविणे कठीण व माहिती हवी . फळ तयार झाल्याची काही लक्षणे खालील प्रमाने आहेत.कलिंगडात देठाजवळ बाळी (टेन्दरील) सुकली कीव वाळवी कि ते तयार झाले असे समजावे.तयार फळ हाताने ठोकून पाहिल्यास ‘बद’ किवा असा आवाज येतो. मात्र कच्चेअसल्यास ध्तुच्या वस्तू ठोकल्यावर निघतो तसा आवाज येतो.कलिंगडाच्या जमिनीला स्पर्श करणाऱ्या भागाचा पंधुरका रंग बदलून तो पिवळसर झाल्यास फळ तयार झाले असे समजावे किवा काढावे.
तयार फळावर हाताने दाबल्यास कर्रर असा फळातून आवाज येतो.
फळ तयार असल्यास देठाजवळ लव अजिबात दिसत नाही. देठ अगदी गुळगुळीत दिसते.
कलिंगडाचे व खरबुजाचे अनुक्रमे हेक्टरी उत्पादन २४० ते ३१० क्विंटल आणि ९० ते १५० क्विंटल येते.
4 thoughts on “Watermelon : कलिंगड, टरबूज, खरबूजाच्या उत्पादनातुन शेतकरी बंधूंनो व्हा मालामाल 2022”