Pomegranate : डाळिंबाची लाली उतरली पहा काय भाव असतील 2022 - डिजिटल शेतकरी

Pomegranate : डाळिंबाची लाली उतरली पहा काय भाव असतील 2022

Pomegranate : डाळिंबाची लाली उतरली

राज्यातील आंबिया बहारातील डाळिंबाची(Pomegranate )काही अंशी विक्री सुरू झालीली दिसत आहे. गेल्या पंधरा दिवसांत डाळिंबाच्या दरात (Pomegranate Rate) सुधारणा झाली होती आणि  मात्र, या बहारातील डाळिंबाचे देखील पावसाने नुकसान (Pomegranate Damage) बरचसे झाले आहे. परिणामी उत्पादनात घट (Pomegranate Production) झाली असली तरी, बाजारपेठेत पावसामुळे डाळिंबाची मागणी (Demand Of Pomegranate) फारशी दिसत नाही. त्याचा फटका डाळिंब(Pomegranate ) दरावर बसला  आहे. गेल्या पंधरा दिवसांत ११० रुपये प्रति किलो असणारा डाळिंबाचा दर ९० रुपयांपर्यंत खाली आला आहे आणि  त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक गणित कसे बसवायचे असा प्रश्न  शेतकर्याना पडला आहे.

pomegranate

राज्यात डाळिंबाचे(Pomegranate) क्षेत्र सुमारे १ लाख ७० हजार हेक्टर इतके प्रमाणात आहे. ज्या भागात शाश्वत अशी पाण्याची सोय आहे. त्याचठिकाणी आंबिया बहार धरला जात आहे. राज्यात अंदाजे २० टक्के म्हणजे ३५ हजार हेक्टरवर जानेवारीपासून आंबिया बहार घेतला जात आहे. या हंगामातील डाळिंबाची काढणी जुलै ते ऑगस्ट महिन्यापासून सुरू होत आहे. हंगामाच्या प्रारंभी डाळिंबाला चांगली मागणी असते, आणि अपेक्षित दरही मिळत आहे. यंदाच्या हंगामात डाळिंबाला प्रति किलोस ११० रुपयांपर्यंत असा दर मिळाला असून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काही अंशी हास्य दिसाला मिळाला. तसेच गणेशोत्सवात डाळिंबाला मोठी मागणी असते आणि  त्यामुळे गणपतीच्या दरम्यान, डाळिंबाची विक्री करण्यासाठी बहाराचे नियोजन शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

हे हि वाचा  : डाळिंब लागवडी संदर्भात शेतकऱ्यांनो जाणून घ्या विशेष तंत्रज्ञान 

दरम्यान, राज्यातील विविध ठिकाणी अजूनही पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे बाजारपेठेत डाळिंबाची आवक होत असली तरी, अपेक्षित अशी मागणी नसल्याचे डाळिंब(Pomegranate) उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले जात आहे. त्यातच डाळिंबाचे उत्पादन घटले चालले आहे. परिणामी ग्राहकही कमी प्रमाणत आहे. त्यामुळे डाळिंबाचा हवा तेवढा उठाव होत नाही आणि  परिणामी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी डाळिंबाला प्रतिकिलोस ११० रुपये मिळणाऱ्या दरात २० रुपयांनी घसरण झाली पाहायला मिळत आहे. सध्या स्तिती  डाळिंबाला प्रतिकिलोस ७० रुपयांपासून ते ९० रुपयांपर्यंत असा दर मिळत आहे. अर्थात दर्जेदार डाळिंबास ९० रुपये असा दर आहे. मात्र, पावसामुळे आणि बदलत्या वातावरणामुळे डाळिंबाचा दर्जा घसरला असल्याने दर्जेदार डाळिंबाचे उत्पादनही कमी होत आहे. त्यामुळे दोन नंबरच्या डाळिंबाला प्रति किलोस ६० ते ७० रुपये असा दर मिळत आहे.

गतवर्षी आंबिया बहरातील डाळिंबाला प्रति किलोस १५० रुपये असा दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा काही प्रमाणात फायदाही झाला होत. मात्र, यंदाच्या हंगामात तब्बल ६० रुपयांनी दर कमी झाले आहेत आणि  त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक गणित बसवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

गणेशोत्सवात डाळिंबाचे(Pomegranate) दर वाढणार का पहा ?

देशभरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो. या वेळी डाळिंबाला अधिक मागणी असते आणि  त्यामुळे दरही चांगले मिळत असतात. परंतु यावर्षी डाळिंबाचे(Pomegranate) घटलेले उत्पादन आणि सध्या कमी असलेली मागणी याचा परिणाम गणेशोत्सवात येणाऱ्या डाळिंबाच्या दराला फटका बसणार की डाळिंबाच्या दरात वाढ होणार अशी चर्चा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये  सद्या सुरू आहे.

हे हि वाचा : केशर आंबा लागवड पद्धत शेतकऱ्यांसाठी विशेष माहिती 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

2 thoughts on “Pomegranate : डाळिंबाची लाली उतरली पहा काय भाव असतील 2022”

Leave a Comment