शेतकर्याचा जीवनात जनावरांना मोठं स्थान असतं. शेतीची कामे म्हटले की, या कामांसाठी गुरांची बैलाची गरज असते. याशिवाय दुग्धव्यवसाय करणाऱ्यांसाठी जनावरे गाई फार महत्त्वाची असतात. आजारांची प्रत्येक ऋतूमध्ये जनावरांच्या आहाराची, तब्येतेची काळजी घेतली जाते. सध्या मॉन्सून चालू झाला याकाळात जनावरांमध्ये विविध प्राणघातक आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शकता आहे. पावसाळ्यात घातक जिवाणूंची संख्या वाढून जनावरांमध्ये विविध आजार आढळून असतात. यामध्ये प्रामुख्याने पायखुरी व तोंडखुरी, घटसर्प, फाशी हे रोग जास्त प्रमाणात आढळून येतात. शेतकरी बंधूंना आपली जनावरे आजारी आहे की नाही हे लक्षात येत नाही व वेळीच उपाययोजना न केल्यामुळे जनावर दगावून खूप नुकसान होऊ होत असते. आपले जनावर दगावून नये म्हणून खालील लक्षणे जनावरांमध्ये दिसल्यास लगेच पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क करावा आणि जनावराची काळजी घावी.
जनावरांची आजारपणाची लक्षणे:
१)जनावर सुस्त व अस्वस्थ दिसून आढळून येत असते.
२)श्वाशोच्छवासाची गती वाढणे, मंदावणे लक्ष टेवणे.
३) डोळ्यातून सतत पाणी वाहत असणे.
४)डोळ्यातील पापणीचे आवरण लाल किंवा पिवळसर दिसून येत असणे.
५) कपातून वेगळे कळपातून वेगळे होऊन सुद्धा शांत उभे राहणे.
६) भूक मंदावणे किंवा संपूर्ण खाणे बंद करणे ते पाहणे.
७) सतत ओरडत किंवा हंबरत असणे.
८) तोंडातून लाळ किंवा फेस गळत असणे.
९) शेणाचा विशिष्ट दुर्गंध येणे, शेण पातळ किंवा अति घट्ट आढळून येत असणे.
१०) दुभत्या जनावरांचे दूध कमी होणे प्रमाण किंवा आटणे.
११) नाकातून, दुधातून, लघवीतून रक्त श्राव पडणे.
१२) वेळेवर माजावर न येणे किंवा घाबरून राहणे, गाभण न राहणे हे पाहणे.
अशा पद्धतीची लक्षणे जनावरांमध्ये आढळून आल्यास पशुवैद्यकाचा सल्ला घेणे फार फायदेशीर ठरत असते.
हे हि वाचा : जमिनीची सुपीकता कशी टिकवाल
पावसाळ्यात जनावरे आजारी पडू नये म्हणून करावयाची उपाययोजना:
१)पावसाळा सुरू होण्यापूर्वी जनावरांना जंतनाशक औषध उपचार द्यावे.
२)जनावरे कोरड्या जागेवर मोकळ्या हवेत बांधली जावी.
३)गोठ्यात भरपूर सूर्यप्रकाश पडेल, अशा पद्धतीने गोठ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
४) पावसाळ्यातील प्राणघातक रोग जसे की घटसर्प, फऱ्या, लाळ्या खुरकत इत्यादी रोग होऊन जनावर दगावू नये, म्हणून लसीकरण तत्काळ करून घ्यावे.
५) कासदाह या आजाराचे प्रमाण पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळून येते यावर स्वच्छता राखणे फार गरजेचे आहे. हा एक प्रतिबंधात्मक पर्याय आहे म्हणून पावसाळ्यात गोठा नेहमी स्वच्छ हवेशीर ठेवा.
६) पावसाळ्यात नदी तलाव पाण्याच्या स्रोतांमध्ये गढूळ पाणी असते ते पाणी आपण जनावरांना दिल्यास आजार होण्याची शक्यता फार जास्त प्रमाणात असते म्हणून शक्यतो. पावसाळ्यात नळाचे किंवा विहिरीचे पाणी जनावरांना दिले पाहिजे.
७) पावसाळ्यात गोठ्यात पाणी साचून रोगराई वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे गोठा सर्व बाजूंनी समतल उतरता करून घ्यावा. कुठेही खोल खड्डा असता कामा नये. अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनी व्यवस्थापन केल्यास होणाऱ्या नुकसानीपासून आपण वाचू शकतो आणि होणार्या हानी पासून जनावरे सुरक्षित ठेऊ शकतो.
6 thoughts on “पावसाळ्यात जनावरांच्या आजारांची लक्षणे 2022”