बिब्बा
बिब्बा हा मध्यम उंचीचा वृक्ष असून, सहा ते सात मीटरपर्यंत वाढतो. पाने काहीशी हृदयाकृती, पानांच्या कडा काहीशा सरळ रेषेत ओल्या आहेत. फळे एक ते दीड इंच आकाराची असतात आणि बी काळ्या रंगाची असते. काजूप्रमाणे बिब्ब्याचे बोंड येते, ते पिकल्यानंतर पिवळे होत असतात. बिब्ब्याला जुलै-ऑगस्टमध्ये फुले येण्यास सुरवात होते आणि परिपक्व फळे जानेवारी ते मार्च या कालावधीत मिळत असतात
रंगाने गर्द – काळी फळे रोपनिर्मितीसाठी वापरावीत आणि सुप्तावस्था मोडण्यासाठी बी 10 ते 14 मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवून दोन दिवस कोमट पाण्यात ठेवावे. त्यानंतर ओल्या गोणपाटात बांधून ठेवावे आणि या पद्धतीने संस्कार केल्यानंतर पिशवीत पेरावे. 5 x 8 आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या पिशवीमध्ये रोपे तयार करता येतात आणि रोपे दोन ते चार फुटांची झाल्यानंतर ती 2 x 2 x 2 फूट आकाराचे खड्डे घेऊन लावावीत. लागवडीपूर्वी खड्डे भरतेवेळी मातीत सुपर फॉस्फेट, सेंद्रिय खत, शेणखत मिसळवीट असतात.लागवड मध्यम, हलक्या, निचरा होणाऱ्या जमिनीत करावी आणि आवश्यकतेनुसार पाणी, खत व्यवस्थापन करावे. पाच-सात वर्षांत झाडे फळे येण्यास सुरवात होत असतात.
सद्यःस्थितीत “वॉर्निश’, “पेन्ट’ बनविणाऱ्या कंपन्यांमध्ये बिब्बा तेलाचा वापर केला जात आहे. बिब्बा फळात जे रसायन असते, त्याचा वापर वॉटर प्रूफिंग साहित्य, वेगवेगळ्या रंगनिर्मितीसाठी केला जात असतात.अर्धवट वाळलेले तेल लाकूड पोखरणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी लाकडांना लावले जाते आणि गाड्यांच्या ऍक्सलला वंगणासाठी तेलाचा वापर होतो. या वृक्षांचा उपयोग लाखेचे किडे वाढविण्यासाठी केला
3 thoughts on “बिब्बा एक औषधी वनस्पती 2022”